HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल- संजय राऊत

मुंबई | एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात तीन पक्षाच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल असे सुतोवाच राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत या मुलाखतीची माहिती दिली आहे. देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार चर्चा झाल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे शरद पवार यांची संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत नक्कीच पाहण्यासारखी असणार यात वादच नाही.

Related posts

विखे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब आता भाजपमय झाले आहे !

News Desk

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे | मुंडे

News Desk