HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या पदाच्या खुर्चीवर; राणेंचा सूचक इशारा

मुंबई | संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहे, असा सूचक इशारा केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिले आहे. राऊतांनी काल (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर राणेंनी आज (१६ फेब्रुवारी) मुंबईतील भाजप कार्यालयातून पत्रकार परिषद घेत संजय राऊत आणि महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. 

राणे म्हणाले, “संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहे. उद्धव ठाकरेंना हटवल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करतो. राऊतांना शिवसेना संपण्याची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. राऊत हे पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राऊत २ जून १९९२ मध्ये हे सामनाचे संपादक म्हणून आले. परंतु, राऊतांना मार्मिकमधून हक्कालपट्टी झाल्यानंतर ते लोकप्रभात गेले. लोकप्रभात असताना त्यांंनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात लेख लिहिले.”   

दरम्यान, राऊतांना कालच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना घाम फूटला होता. राऊत हे फक्त आरोप करतात?, त्यांनी परावे द्यावे?, सुजीत पाटकर हा राऊतांचा कोण लागतात?, त्यांच्या नावाने व्यवहार कसे करता? आणि याच कंपनीत राऊतांच्या मुली कशा संचालक असतात?, असे अनेक सवाल राणेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केले आहे. 

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • आम्हाला सरकार कसे चालवयाचे हे माहिती आहे आम्ही नेहमी विरोधी पक्षात राहणार नाही
  • भाजपच्या नेत्यांबद्दल बोललात तर ईडी आणि सीबीआयला पुरावे दिले जातील
  • आता राऊत हे शरद पवारांचे खास माणूस
  • महाराष्ट्रात एवढा लाचार मुख्यमंत्री कधी झाला नाही. उद्धव ठाकरेंना टोला
  • राऊतांनी कुनाच्या कानाखाली तरी मारली का?
  • राऊतांनी केलेल आरोप बिनबुडाचे आहेत
  • एकीकडे पत्रकार असल्याचा दावा, दुसरीकडे छापखाना
  • राऊत ओव्हर टाईम करतात आणि सामनातून पगार करतात
  • राऊतांना मुख्यमंत्री पदाची हावा
  • राऊतांनी शिवसेना संपण्याची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली
  • राऊतांची कुंडली माझ्याकडे आहे, वेळ आली की ती बाहेर काढेन
  • ईडीने गप्प बसू नये?, 
  • ईडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप कोणत्या आधारावर?
  • खासदारकी मिळवण्यासाठी उद्धव ठाकऱ्यांविरोधात वाईट भाषा वापरली
  • अलिबागमधील ५० एकर जमिन लाखांत खरेदी केली, खासदार फंडातून तेथे रस्ता बांधला
  • लोकप्रभात असताना राऊतांनी बाळासाहेबांविरोधात अनेक लेख लिहिले
  • संपादकाच्या पदी अशी भाषा शोभते का?
  • एका संपादकाने काय शब्द वापरले, आम्ही नाही वापरू शकते
  • जकाय शिवसेना प्रमुख हाच झालाय, अशा अवेशात ही पत्रकार परिषद घेत आहे
  • राऊतांना एवढे दिवस शिवसेना भवन आठवले नाही
  • घाबणाराच म्हणतो मी कोणाला घाबरत नाही
  • संजय राऊतांची केविलवाणी परिस्थिती
  • राऊतांना घाबरुण घाम फुटला होता
  • १५ फेब्रुवारीला तुम्ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद झाली
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार!

News Desk

…मग दानवे काय ‘शुद्ध घी’वाले आहेत काय ? ED कारवाईवरून बच्चू कडूंचा सवाल

News Desk

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या – धनंजय मुंडे  

News Desk