HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा होणार राजकीय भूकंप? देवेंद्र फडणवीस व संजय राऊत यांची भेट?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली आहे.. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी ही भेट झाल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

दरम्यान, ही भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र ही भेट झाली नसल्याचे म्हटले. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली होती. या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.

संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. मात्र, टीव्ही9 मराठीच्या रिपोर्टरने जेव्हा त्यांना तपशीलवार माहिती दिली. तेव्हा मात्र, राऊत यांनी आपण हॉटेलमध्ये होतो, पण फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील तर त्याची मला माहिती नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जसं राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही तसं पावसात भिजूनही पंतप्रधान होणार नाही – अवधूत वाघ

News Desk

शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर

News Desk

निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी, आज दिग्गज नेत्यांच्या सभा

News Desk