HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, संजय राऊत म्हणतात…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा सुरु झाल्या. लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला असता परमेश्वराला माहित असं म्हणाले होते. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

संजय राऊतांचा राज ठाकरेंना चिमटा

याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या तिखट भाषेतील टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली. दैनिक ‘लोकसत्ता’ने आज राज ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर देतानाच उद्धव-राज एकत्र येणार का? या प्रश्नावरही उत्तर दिलं.

युतीचं नंतर पाहू – राज ठाकरे

पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुणाशी युती होईल का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेच्या ‘धडक मोर्चा’ला सुरुवात

News Desk

पारदर्शक मुख्यमंत्र्यांचा 18 हजार कोटींचा घोटाळा

News Desk

जनतेची जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं आहे – संदीप देशपांडे

News Desk