HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो – संजय राऊत

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावरून सध्या राजकारणात नव्या विषयाला तोंड फुटलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील फेक अकाऊंटसबद्दल गौप्यस्फोट केला होता. मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी हे अकाऊंट तयार करण्यात आले होते. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना”राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो,” असा इशार देत सल्ला दिला आहे.

“अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत. सायबर फौजांचा बेकायदेशीर वापर देशाला, समाजाला घातक ठरू शकतो हे त्यांनी मान्य केले पाहिजे. राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन आणि विरोध करणाऱ्यांना खच्ची करण्यासाठी या फौजांचा वापर उद्या देशावरच उलटू शकतो. अमित शहा यांनीच एका कार्यक्रमात सांगितले होते, ”आम्ही कोणतीही बातमी आमच्या हजारो ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपच्या माध्यमांतून पटवून देऊ शकतो.” हा आत्मविश्वास एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून ठीक आहे, पण आज देशाची सूत्रे आपल्या हाती आहेत हे त्यांना विसरता येणार नाही.

ज्या सोशल मीडियाने मनमोहन सिंग व राहुल गांधी यांना निकम्मे ठरवले, त्याच सोशल मीडियावर रिकाम्या बोगद्यात लष्करी गाडीवर उभे राहून आपले पंतप्रधान हात हलवत पुढे निघाले असल्याचा ‘व्हिडीओ’ व्हायरल झाला व पंतप्रधानांची प्रचंड खिल्ली उडवली गेली. हे बरोबर नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, सेनाप्रमुख, पोलीस यांना ‘टार्गेट’ करणे म्हणजे देशाच्या भवितव्याचा खड्डा खणण्यासारखे आहे.

Related posts

भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर अज्ञाताने भिरकावली चप्पल

News Desk

‘शिर्डीमध्ये मोदींनी केला शेतक-यांचा इव्हेंट’

News Desk

मनसेचा फक्त झेंडा बदलला, भूमिका नाही !

अपर्णा गोतपागर