HW News Marathi
महाराष्ट्र

इतरांचे ट्विट समजण्यासाठी स्वत:चे ट्विटर स्वत: वापरावे लागते, राऊतांचा पुन्हा कंगनाला टोला 

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राजकारणात खबळबळ उडाल आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कंगनाला टोला लगावला आहे. कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही. कंगनाने स्वतःचे ट्विटर हँडल स्वतः वापरावे. राजकीय पक्षांना ट्विटर हँडल चालवण्यास देऊ नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आज (५ सप्टेंबर) पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो आम्ही आवाज उठवू, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. यावेळी त्यांनी कंगनाला मराठी वाचता बोलता येतं का? असा प्रश्नही विचारला. तसेच इतरांच्या ट्वीटचे अर्थ कळण्यासाठी स्वतःचं ट्वीटर खातं स्वतः वापरावं लागतं, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे द्यायचं नसतं, असा टोलाही लगावला आहे. तसेच,“हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात.

संजय राऊत म्हणाले, “इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता येतं का? मराठी बोलता येतं का? माझ्या ट्वीटचा अर्थ समजून घेण्यासाठी स्वतःचं अकाऊंट स्वतः वापरावं लागतं. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे ट्विटर अकाऊंट वापरायला द्यायचं नसतं. म्हणून असे घोळ होतात. काल कंगनाबाबत राज्याचे गृहमंत्री, परिवहन मंत्री यांनी भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका त्यातून स्पष्ट होते. मी सुद्धा पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, त्याविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फक्त रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरी आयकराचे छापे’- अजित पवार

News Desk

“तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”, बाळासाहेब थोरातांनी धवलसिंहाना साद 

News Desk

बीड नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे वर्चस्व!

Aprna