HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत धावले नाना पटोलेंच्या मदतीला म्हणाले, “नाना घाबरू नका…!”

मुंबई | राज्यात नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण मोठं गाजत आहे. यावरुन राजकारणात मोठा गोंधळ उडाला होता. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज (१५ मे) माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यूपीए अध्यक्ष पदावरून या नेत्यांमध्ये वाद झाले होते. इतकचं काय तर सामना अग्रलेखावरुन देखील शाब्दिक चकमक झाली होती.

काय म्हणाले संजय राऊत?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. देशांमध्ये कोणाचे फोन टॅप होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील. ही आता राजनैतिक बाब झाली आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टॅपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असं राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते पटोले?

नाना पटोले यांनी काल ते भाजपमध्ये असताना त्यांचे फोन टॅप केले जात होते असा दावा केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2016-17 साली फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यात माझाही फोन टॅप करण्यात आला होता, अशी माहिती आपल्याला खासगी टीव्ही चॅनलकडून मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता.

तसेच, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खाम नदीच्या पुनरूज्जीवनातून शहराचा शाश्वत विकास! – आदित्य ठाकरे

Aprna

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

Aprna

तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा… पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा

News Desk