HW News Marathi
महाराष्ट्र

सेना-भाजप विधानपरिषदेची निवडणूक एकत्र लढवणार

मुंबई : या महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक सेना-भाजप एकत्र लढणार आहेत. यावरुन २०१९ची निवडणूक सेना-भाजप एकत्र लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र वारंवार प्रसार माध्यमातून समोर येत होते. कधी सेना-भाजपवर टीक करत होती, तर कधी भाजप-सेना टीका करत होती. पण, विधानपरिषदेची निवडणुकी एकत्र लढण्याच्या निर्णयावरुन तुर्तास तरी सेना-भाजपच्या वादावर पडदा पडला आहे.

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूका होणार आहेत. राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ३१ मे २०१८ रोजी संपतेय. राष्ट्रवादीचे जयंत जाधव (नाशिक) आणि बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली), काँग्रेसचे दिलीप देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) आणि भाजपाचे प्रवीण पोटे (अमरावती), मितेश भांगडिया (चंद्रपूर) या सदस्यांची मुदत २१ जून रोजी मुदत संपत आहे. त्यांच्या जागी नवे सहा प्रतिनिधी विधानसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक असे सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार! – अजित पवार

Aprna

आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा अडचणीत!

News Desk

सरकारच्या निवेदनातून शेतकऱ्यांचे कितपत समाधान? – जयंत पाटील

Aprna