HW News Marathi
महाराष्ट्र

अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून २५ जण नदीत कोसळले

सातारा | मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्ययात्रा जात असतानाच अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात मृतदेहासह २५ जण नदीत कोसळले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावात घटना घडली असून या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी (३० डिसेंबर) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

हा पूल नादुरुस्त अवस्थेत होता व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या २० वर्षांपासून याची कोणतीही डागडुजी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर या आपघातात रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाचगणी येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, महाबळेश्वरपासून अंदाजे ४० किमी अंतरावर खरोशी गावात कृष्णाबाई कदम यांना अंत्यसंस्कारासाठी नेत असताना गावाच्या मंदिराजवळ असलेला वीस वर्ष जुना लोखंडी पूल कोसळला यामध्ये भीमराव भागू कदम, अशोक चांगु कदम, शंकर चांगु कदम, रामचंद्र कदम, विजय शंकर कदम, राजेश शंकर कदम, रमेश भीमराव कदम व रमेश (मुल्या) धोंडू कदम हे जखमी झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रातील भाजप ‘शिवभक्तां’चे मौन चिंताजनक – सामना अग्रलेख

News Desk

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

News Desk

सोनिया गांधींच्या दिल्लीतील बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

News Desk
महाराष्ट्र

एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार बालसंगोपनासाठी ६ महिने रजा

News Desk

मुंबई। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी ६ महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी त्यासंदर्भातील घोषणा केली आहे. महिला कर्मचारी, पत्नी ह्यात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांना सुद्धा ही रजा मिळू शकेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

महिला सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले आहे त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मोठा अर्थिक हातभार लागत असल्याचे रावते यांनी सांगीतले.

एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात ६ ऐवजी ९ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था आहे. नोकरी करीत असताना महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. विशेषत: परिक्षांच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची गरज अधिकअसते. या सर्व बाबी लक्षात घेऊन एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही १८० दिवसांची बालसंगोपन रजा घेता येणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्ती महामंडळातील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील. मुलाचे वय १८ वर्षाचे होईपर्यंत ही रजा घेता येईल. एका वर्षात २ महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येईल. पहिल्या २ ज्येष्ठतम मुलांकरीता ही रजा घेता येईल.

 

 

Related posts

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टोला

News Desk

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडल्या डोंबिवलीकरांच्या समस्या

News Desk

 महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही शब्द दिला नव्हता –   प्रवीण दरेकर

News Desk