HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल,लवकरचं होणार शस्त्रक्रिया

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले आहे.या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.३१ मार्चला त्यांची एन्डोस्कोपी झाल्यानंतर पवार यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.त्यामुळे या दरम्यान पवारांचे सर्व कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहेत.

सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित करण्यात आले होतो. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृप्ती देसाईंना हवे शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद !

News Desk

शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादीची बैठक सुरू, एल्गारच्या तपासावर होणार चर्चा

swarit

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

swarit