HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा;शरद पवारांचे आश्वासन…

मुंबई | ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटना प्रतिनिधींना दिले.

एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीत एसटी संघटनेच्या प्रतिनिधींनी थकीत वेतनाबाबत चर्चा केली व या समस्येबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवार यांना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एकनाथ शिंदे केवळ सही करणारे मंत्री’- नारायण राणे

News Desk

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार! – मुख्यमंत्री

Aprna

राज्यात एका दिवसात ५५२ नवे कोरोना रुग्ण, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ४२०० वर पोहोचली

News Desk