सातारा। “कुस्ती आणि पैलवान हा भाजपच्या तोंडात न शोभणारा विषय आहे, ” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि भाजपवर भर पावसात सडकून टीका केली. शरद पवार यांनी काल (१८ ऑक्टोबर) साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या समर्थन भर पावसात प्रचार सभा घेतली.
सभेदरम्यान पवार म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊ गेले आणि एका बाजुला मुख्यमंत्री म्हणतात मला निवडणुकीत काही दिसतच नाही, ते म्हणतात या निवडणुकीत दुसऱ्या बाजुला कोणी पैलवान दिसत नाही, मी त्यांना जाहीर पणे सांगितले. पण या तालुक्यातमध्ये उत्तम पैलवान तयार करणारे आमचे सहकारी आहे. कुस्ती आणि पैलवान हा भाजपच्या तोंडा न शोभणारा विषय आहे,” असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर बरसले.
लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली !
“एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.