HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी राहुल गांधींवर टिका केली नाही ,ते राहुल गांधींना समजावून सांगतील

मुंबई | भारत-चीन मुद्द्यावरून गेले अनेक दिवस वाद सुरू आहेच. राजकारणातही त्याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटताना दिसत आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नितीन राऊत असे म्हणाले की, ‘शरद पवार महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख घटकपक्ष आहेत. राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की १९६२ च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता. दरम्यान, शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री होते, तेव्हा त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या, तर बरं झालं असतं,’ असा टोलाही नितीन राऊत यांनी लगावला होता.

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार द्विपक्षीय कराराबद्दल बोलले होते, त्यात शस्त्र हाती घ्यायची नाहीत, असे शरद पवारांना म्हणायचे होते. पवारांनी राहुल गांधींवर टीका केली नाही. राहुल गांधींना शरद पवार समजवून सांगतील, असे त्यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीनच्या लष्करामध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झटापट झाली, यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, ‘लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावलेला ४५ हजार चौ.किमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही.’ असे शरद पवार म्हणाले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे

News Desk

कंपाऊंडरला सतत चर्चेत राहायची भूक, संजय निरुपमांचा  राऊतांना अप्रत्यक्ष टोला

News Desk

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

News Desk