HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाववर शरद पवार जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार

मुंबई। कोरोना व्हायरस देशात वेगाने पसरत असून राज्यात कोरोनाबाधतांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७०० पार केली असून राज्यात १३१ वर गेली आहे. तर राज्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ मार्च) फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.

तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. तर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

एका महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’

एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. तशाप्रकारे आदेश पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना दिले आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांचा संख्येत वाढ

केरळपाठोपाठ महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात कोरोना लागण झालेल्यांची संख्या १३१ आहे. कर्नाटकात ५५, तेलंगणा ४५, गुजरात ४४, दिल्ली ३९ अशाप्रकारे रुग्णांची संख्या आहे. कोविड १९ चा मुकाबला करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सज्ज आहेत. केंद्र सरकारकडून १ लाख ७० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आ. प्रशांत परिचारक यांनी घेतला सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर आक्षेप…

News Desk

चंद्रकांत पाटील पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ‘धर्मांध वायरस’! – अतुल लोंढे

News Desk

‘झाडे वाचवा, जंगले वाचवा’ असे सांगणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जातात – संजय राऊत

News Desk