HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक, पण ते शत्रू नाहीत !

मुंबई | “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत,” अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. यानंतर भाजपचे विधानसभेतेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांच्या वक्तव्यवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस म्हटले, शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

फडणवीस म्हणाले, “शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. मी गोपिचंद पडळकर यांच्याशी बोलणे झाे असून भावनेच्या भारात आपण हे विधान केल्याचे पडळकर यांनी मान्य केले आहे. याबाबत ते लवकरच स्पष्टीकरण देतील. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. सोलापुरातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.’

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संबंधित बातम्या

राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची !

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांना कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करण्यास सांगेन, गडकरींचा अधिकाऱ्यांना इशारा

News Desk

मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, मनसेचा नाव न घेता योगींना टोला 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

News Desk