HW News Marathi
महाराष्ट्र

“मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ”- शरद पवार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतील योजना जनतेसाठी राबवाव्यात, असे आवाहन करून विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेरही भाजपच्या नेत्यांना दिला. त्याचबरोबर दुसरीकडे मी येणारच असं काही लोक सतत सांगत होते. पण ते येणारच हे काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून राज्याल अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच आमच्या सत्ताधारी नेत्यांवर होत असलेल्या चौकश्या या राजकीय आकसाने सुरू आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला.

यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय

चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असं पवारांनी सांगितलं. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात ९ जणांची समिती करणार चौकशी

News Desk

‘ही भारतमातेसोबतची गद्दारी’; नितेश राणेंचा राऊतांना टोला

Manasi Devkar

बिहारमध्ये निवडणुकीसाठी मुद्दे संपले असतील तर… संजय राऊत यांचा टोला

News Desk