HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार?, राऊतांच्या विधानावर शरद पवार म्हणतात..

मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते देशाला निश्चितच नेतृत्व देतील, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. यावर, महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर अर्थातच पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय लेव्हलवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं विधान शरद पवारांनी केलं.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणाला दिलेली दाद

सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानपदी बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरे हे लोकप्रिय आहेत, त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे,’ असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अलीकडंच म्हणाले होते. त्याचं हे मत म्हणजे एका सुसंस्कृत राजकारण्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वगुणाला दिलेली दाद आहे, असं शेवाळे यांनी लेखात म्हटलं आहे. तीन वेगवेगळ्या विचारधारांच्या पक्षांचं सरकार आणि रोज सकाळी सरकार पाडण्याच्या धमक्या देणारे विरोधक अशा दुहेरी आव्हानाचा मुकाबला करतानाच राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करणारे मुख्यमंत्री खरे ‘जनतेचे नायक’ ठरले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

राऊत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो , असं प्रत्येकाला वाटतं . हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी , प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे . ते देशाला नेतृत्व देतील , अशा शुभेच्छा मी त्यांना देतो , असं राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंडे साहेबांना तर शपथही घेता आली नव्हती”, पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत झाल्या भावुक!

News Desk

अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, आठवलेंचा विश्वास

News Desk

मंत्रालयात दारूच्या बाटल्या, प्रवीण दरेकर, चित्रा वाघांची राज्य सरकारवर जोरदार टीका!

News Desk