HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

शरद पवार ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार !

मुंबई | भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व शरद पवार यांची चर्चा झाली असून गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये शरद पवार जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या गंभीर विषयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी शरद पवार याबाबत चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले. भाजप केंद्र सरकारचा दुरुपयोग करून निवडून आलेल्या सरकारांचे अधिकार काढून घेण्याचा व त्यांना पाडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. या विषयावर पवारसाहेब ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांशी चर्चा झाली आहे. नक्कीच रणनीती ठरवून पुढे काम केले जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या मास्कमधून देखील धडधडीत खोटेपणा दिसत होता – देवेंद्र फडणवीस

News Desk

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk