HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवारांचा मराठवाडा दौरा तर अजित पवार बारामतीत दाखल

बारामती | परतीच्या पावसाने राज्यात प्रचंड नुकसान केले आहे. राज्यात अनेक भागात पूर परिस्थिती आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्याचा २ दिवसीय दौरा करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ते मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या भागांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतील. १८-१९ ऑक्टोबर या दोन दिवसांत शरद पवार मराठवाड्यात असतील. ते तुळजापूर, उमरगा,औसा, परंडा ,उस्मानाबादमधील भागांना भेटी देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळीच पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. पूर नेमका कशामुळे आला आणि आता काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दौऱ्यानंतर अजित पवारही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडून विभागांतर्गत जिल्ह्यांचा video conference द्वारे आढावा घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पाण्याची वर्षा बिलाचे अवर्षण’, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर व्यंगचित्रातून टीका

News Desk

नाना पटोलेंनी कोणतीही विधानं केली तरी आघाडीला धोका नाही – अजित पवार

News Desk

योगी सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर आल्या ८,५०० सूचना!

News Desk