HW News Marathi
Covid-19

शरद पवारांच्या भेटीला माजी नगराध्यक्ष, पवार विचारतात “बारामतीकर ठीक आहेत ना?”

बारामती | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे शस्त्रक्रियेनंतर मुंबईत सध्या विश्रांती घेत आहेत. मात्र याही स्थितीत त्यांचं लक्ष बारामतीकडे असल्याचं पाहायला मिळालं. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी पवारांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना स्थितीची माहिती घेत बारामतीकरांची आपुलकीने चौकशी केली.

बारामतीत गेल्या दोन महिन्यात कोरोनानं हैदोस घातला आहे. दिवसाला किमान 300 ते 400 रुग्ण आढळत असल्याने बारामतीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर बारामतीत ५ मेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये केवळ औषधाची दुकानं आणि रुग्णालयं सुरु आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत.

“लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत फरक पडला का?” पवारांचा सवाल

बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना स्थितीबद्दल माहिती घेतली. बारामतीत कोरोना निर्मूलनाबद्दल सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती घेतानाच लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत काही फरक पडला का, याबद्दलही त्यांनी विचारपूस केली. तसेच, बारामतीत आरोग्य यंत्रणा राबवताना कसलीही मदत लागली तरी त्याबद्दल तत्पर निर्णय घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. एकंदर शरद पवार यांचे बारामतीवर बारकाईने लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनानंतर गरीबांसमोर मोठे संकट उभे राहणार, राघुराम राजन यांची भिती

News Desk

“उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचे निमंत्रण, मात्र जाणे टाळावे”, राष्ट्रवादीचा सल्ला

News Desk

राज्यात आज ३ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk