HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

आरती मोरे | पुण्यात पंकजा मुंडे,धनंजय मुंडे आणि शरद पवार यांच्यात ऊसतोड कामगारांच्या मुद्दयांवर बैठक झाली.उसतोड कामगारांसाठी समाधानकारक निर्णय झाला का? हा विषय चर्चेत आलाच नाही कारण मुंडे बहीण-भावाच्या मनोमिलनाची अधिक चर्चा झाली.पवारांनी मुंडे बहिण-भावाची दिलजमाई करण्यासाठी हा घाट घातला का असा प्रश्न समोर येतोचं! मात्र एकीकडे मुंडे बहिण-भाऊ चर्चेत असताना पंकजा मुडेंचा पवारांना नमस्कार घालतानाचा फोटो समोर आला आण चर्चा सुरू झाली पंकजा राष्ट्रवादीत जाणार का ? याची.

त्यातचं पंकजांनी खुल्या मनाने पवारांच्या स्पिरीटच कौतुक केलं आणि राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी खडसेंनंतर पंकजा ताई राष्ट्रवादीत येणार अशा पोस्टी फिरवायला सुरूवात केली.पुण्यातल्या बैठकीत शरद पवारांनी पंकजांना राजकीय सल्ला दिला असेल का,यावरही सध्या तर्कवितर्क लगावले जातायतं. पण पंकजांच्या पक्षातरांची शक्यता सध्या तरी दिसत नाही आणि पक्षांतर झालचं तर ते शिवसेनेत होईल असं एकंदरीत वातावरण आहे. पंकजांच्या पक्षांतरांची चर्चा होतेय म्हणुन गोपिनाथ मुंडेच्या भाजपविषयीच्या नाराजीचा किस्सा तुम्हांला सांगावा वाटला.

२०१४ मध्ये आपल्याला भाजपमध्ये डावललं जातयं या भावनेमध्ये असलेले गोपिनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते.यासंबंधी निर्णय घेण्याआधी गोपिनाथ मुंडेंनी आपले कट्टर विरोधक असलेल्या पवारांशी चर्चा केली.शरद पवारांनी त्यावेळेस गोपिनाथ मुंडेंना सांगितलं, ‘भाजप सोडू नका,तुमच्या सगळ्या अपेक्षा पुर्ण होतील’ त्यामुळे पवारांनी मुंडेंना भाजप न सोडण्याचा दिलेला सल्ला पंकजांच्या निमित्ताने चर्चिला जातोय.खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या ‘उत्सव ‘या पुरवणीत हा किस्सा लिहीला होता.

‘तुमच्या सगळ्या मागण्या भाजपात पुर्ण होतील’ असं सांगणाऱ्या पवारांनी त्यावेळी मुंडेचं बंड थांबवण्यासाठी राजनाथ सिंग यांच्याशीही बातचीत केली होती,असं राऊंतांनी लिहील आहे.त्यामुळे गोपिनाथ मुंडेंना राजकीय सल्ला देणारे शरद पवार आता पंकजा मुंडेंना काही सल्ला देतात का हे पाहावं लागेल.

Related posts

शेअर बाजारात मोठी घसरण

अपर्णा गोतपागर

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

News Desk

पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन !

News Desk