HW News Marathi
महाराष्ट्र

आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही, शरद पवारांनी घेतला आठवलेंचा समाचार

मुंबई | शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवार यांनी एनडीएत यावे. शरद पवार आले तर केंद्रातील सत्तेत वाटा मिळेल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केले होते. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आठवलेंचा एक देखील आमदार अथवा खासदार आहे का, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. आज (२९ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

रामदास आठवलेंना कुणी गांभीर्याने घेत नाही, असा टोला देखील पवार यांनी लगावला आहे. शरद पवार यांच्यासारखा नेता एनडीएत आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची साथ मिळेल. देशाच्या विकासाला त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी एनडीएत यावं, त्यांना केंद्रात सत्ता मिळेल. शिवसेना आम्हासोबत आली नाही तर राष्ट्रवादीनं भाजप आणि रिपाइंसोबत यावं. रिपाइं यापूर्वी राष्ट्रवादीसोबत होती, असे आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भास्कर जाधव हे नरकासुर आणि उद्धव ठाकरे देखील सोंगाड्या”, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

News Desk