HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली सोनिया गांधींची भेट, शपथविधीचे दिले निमंत्रण

नवी दिल्ली । अवघ्या ४ दिवसांमध्ये ‘फडणवीस सरकार-२’ कोसळल्यानंतर आता राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिवसेना या महाविकासआघाडीच्या सरकारचे नेतृत्त्व करणार असून आज (२८ नोव्हेंबर) संध्याकाळी ५.३० वाजता शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या संपूर्ण पार्श्वभूमीवर काल (२७ नोव्हेंबर) शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. आदित्य ठाकरे हे बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. यावेळी सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री स्वतः पंतप्रधान मोदी यांना फोन करून शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. पहिला ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसेनेसाठी ही अत्यंत मोठी गोष्ट ठरते. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे. केवळ प्रशासनच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत विशेष लक्ष देण्यात येत आहे. देशभरातील अनेक नामवंतांना, बड्या नेत्यांना या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान, यासोबतच शिवसेनेकडून राज्यातील ४०० शेतकऱ्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. आमचे सरकार सामान्यांचे सरकार असेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १ महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. दिवसेंदिवस राज्यातील हा सत्तापेच वाढतच गेलेला पाहायला मिळाला. मात्र, आता अखेर हा पेच जवळपास सुटला आहे. राज्यातील अवघ्या ३ दिवसांत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ‘फडणवीस सरकार २’ कोसळले. त्यामुळे, महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या संघर्षानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या ३ पक्षांकडून सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्था’वर दाखल; चर्चांना उधाण

Aprna

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk

मी तुम्हाला खर्च करण्यासाठी पैसे उसने देतो पण… रोहीत पवारांचा मोदींना टोला

News Desk