HW News Marathi
महाराष्ट्र

नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्था’वर दाखल; चर्चांना उधाण

मुंबई । भाजपचे बडे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. गुढीपाडव्यानिमित्त राज यांनी केलेल्या भाषणानंतर रंगलेल्या भाजप-मनसे युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज (३ एप्रिल) झालेली ही भेट अत्यंत मोठी आणि महत्त्वाची ठरते. मुख्य म्हणजे ठाकरे आणि गडकरी या दोघांची भेट ही पूर्व नियोजित नसल्याची माहिती मिळते. त्यामुळे, अर्थातच या दोघांच्या भेटीवरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर त्या भाषणानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी राज यांचं कौतुक केल्याचं दिसलं. त्यामुळे, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच टायमिंग साधत आज या दोन्ही नेत्यांची झालेली भेट ही महत्वाची मानली जाते. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरेंनी कालच्या (२ एप्रिल) मेळाव्यात महाविकासआघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, नवाब मलिक आणि अनिल देशमुख आदी मुद्यावरून राज्य सरकारवर तोफ डागली. तर भाजपला मात्र सॉफ्ट कॉर्नर दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार नाहीत! सेनेनं भाजपला सुनावलं

News Desk

तीन तलाक कायद्याच्या विरोधात जिल्हाअधिकारी कार्यलयावर मोर्चा

swarit

‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या’, मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता आनंद महिंद्रांना टोला

News Desk