मुंबई | “शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळू नये, म्हणून भाजप विरोधी पक्षात बसायला देखील तयार आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. “शिवसेनेविरोधात भाजपचे षडयंत्र असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.” “शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का?,असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर राऊत म्हणाले की, तुम्हाला जे समजाचे आहे ते समजा असे म्हणाले. राऊतांनी आज (११ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर ताशेरे ओढले आहेत.
“राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ,” असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादींने जे बोले त्यांनी ते करावा, असा आवाहन देखील त्यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी कसोटीचा क्षण असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. यावरून शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राऊतांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसेचे मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. “भाजप विरोधात बसण्यास तयार आहेत. मात्र, ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, असा आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे. भाजपचे शिवसेनेविरोधात षडयंत्र असल्यामुळे भाजपसोबत राहणार नाही, असे सांगित एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राऊतांनी दिले आहेत.
भाजपविरोधी पक्षात बसण्यास तयार
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणे, ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम न राहणे मग विरोधी पक्षातदेखील बसू हा जनतेचा अपमान आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने केंद्रीय मंत्री राजीनामा देत आहे. एका मंत्रिपदासाठी अशा खोट्या वातावरणात का राहावे? महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले ते दुर्दैवी, यासाठी भाजपाच जबाबदार आहेत. जे ठरले आहे त्यावरुन बोलण्यास तयार नाही तर कोणते नाते आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.