HW News Marathi
Covid-19

स्थलांतरित मंजुरांची यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका !

मुंबई | आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वक्तव्यावर रेल्वेंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत ट्वीट केले, “महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे,” असे तुम्ही सांगितले. सध्या स्थलांतरित मंजुरांच्या श्रमिक ट्रेनवरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आहेत. या वादात राऊत यांनी उडी घेत पियुष गोयल यांच्यावर ट्वीटवर वाययुद्ध रंगले आहे.

पियुष गोयल म्हणाले, “महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. राज्य सरकारने अडकलेल्या मजुरांची यादी एका तासात रेल्वेला पाठविण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. त्यानंतर रात्री दोन वाजता पुन्हा त्यांनी ट्विट करत १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची आपली तयारी असताना फक्त ४६ ट्रेनची यादी आपल्याला मिळाली, असा दावा करत पीयूष गोयल यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांवर उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“१४ मे २०ला सुटलेल्या नागपुर – उधमपूर ट्रेनसाठी कोणती यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले. कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका,” असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

फक्त एक विनंती, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी !

‘या’ कारणामुळे पियुष गोयल चिडले मुख्यमंत्र्यांवर

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…त्यानंतरच आम्ही १०० युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ ! ऊर्जामंत्र्यांचा निशाणा 

News Desk

दिलासादायक! देशात आत्तापर्यंत ८३२४ कोरोनामुक्त

News Desk

महाराष्ट्रात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरे म्हणतात…

News Desk