HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचा सोमय्यांना सवाल

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांनी वाईन व्यावसायिकांसोबत पार्टनरशीप केली आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांच्या आरोपावर राऊतांनी प्रतिक्रिया देत म्हटले, “आमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी. एखाद्या कुटुबांतली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का?, असे ते म्हणाले. 

राऊत पुढे म्हणाले, “मला शरद पवारांचा फोन आला. तेही हसत होते, जर आमच्या कुटुंबाची एखादी वायनरी असेल तर मी नक्कीच त्यांच्या नावावर करून द्याला तयार आहे. कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे-शेंगदाणे विकतो का?, भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का?, अमित शहांचा मुलगा ढोकळा विकतो का?” असा सवाल संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.   

किरीट सोमय्या नेमके काय आरोप केला

अशोक गर्ग हे २०२१ पासून दोन कंपन्या चालवित आहेत. दोन्ही पैकी एक कंपनी ही वाइन वितरणाचा व्यवसाय आहे. गर्गंच्या कंपनीची उलाढाल जवळपास १०० कोटी इतकी आहे. गर्गंसोबत राऊतांनी १६ एप्रिल २०२१ रोजी त्यांनी पार्टनरशीप केली आहे. या कंपनीमध्ये राऊतांची कन्या विधिता आणि पूर्वशी या दोघीची पार्टनरशीप आहे. राऊतांनी त्यांच्या हितसंबंधितांची माहिती जाहीर करावी, असे सोमय्या म्हटले. सोमय्यांनी आज (३० जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप केले आहे. 

भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र येणे शक्य नाही – सामना रोखठोक

“भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र येणे शक्य नाही. आणि ग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे,” राऊतांनी सामनाच्या मुखपत्रातील रोखठोक स्तंभातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत जाहीर सर्वपक्षीय चर्चा आयोजित करा, चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

ठाकरे सरकार मधील आणखीन काही नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर!

News Desk

मुंबई-वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

News Desk