HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांची भूमिका कायदा भंग करणारी; राऊतांचे भगतसिंग कोश्यारीवर टीकास्त्र

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर घाणाघाती हल्ला केला. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर गेल्या आहेत. “राज्यपाल हे महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. कोश्यारींना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यपालांची भूमिका कायदा भंग करणारी आहे,” असे म्हणत राऊतांनी राज्यपालांवरी टीका केली आहे. 

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तारीख निश्चित करता येत नाही, अशी भूमिका राज्यपालांनी घेतला असून यासंबंधितचे पत्र राज्यपालांनी विधीमंडळाच्या सचिवालयात पाठवल्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर गेली आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी राज्यपालांवर टीका केली. राऊत म्हणाले, “राज्यपाल हे महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. कोश्यारींना राज्यपाल पदावर राहण्याचा अधिकार नाही. आणि राज्यपालांची भूमिका कायदा भंग करणारी आहे.”

पोलीस बदली प्रकरणी पोलीसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (१३ मार्च) चौकशी केली. यावर राऊत म्हणाले, राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यावर रडता का?, महाराष्ट्र पोलीस खोटे गुन्हे दाखल करत नाही. आणि पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे. नोटीसला का घाबरता?, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलली

News Desk

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

Arati More

कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ई पासवरून राणे बंधूंचा सरकारवर प्रहार

News Desk