HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय स्नेहभोजनात राऊत आणि गडकरींची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केला आहे. राज्यभरात राऊतांवर झालेल्या कारवाईने पडसाद उमटले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी आज (५ एप्रिल) महाविकासआघाडीच्या नेत्यांचे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या स्नेहभोजनामध्ये संजय राऊत आणि भाजपचे नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले. गडकरीच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ईडीने आज ईडीने राऊतांची अलिबाग ९ भूखंड आणि दादरमधील १ फ्लॅट जप्त केला आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते.

राज ठाकरे-नितीन गडकरी यांची भेट

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर त्या भाषणानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी राज यांचे कौतुक केल्याचे दिसले. यानंतर नितीन गडकरींनी राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच टायमिंग साधत रविवारी (३ एप्रिल) या दोन्ही नेत्यांची झालेली भेट ही महत्वाची मानली जाते. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्याला अटक; आजची रात्र जेलमध्येच

Aprna

“…तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा”, खोतांची परबांवर टीका

News Desk

अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य!

News Desk