HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई | गेल्या महिनाभर सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकासआघाडी यांची आज (२२ नोव्हेंबर) अंतिम बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली. ठाकरे घराण्यातील उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री झाले आहेत. महाविकासआघाडीची बैठकी वरळीतील नेहरू सेंटरमध्ये जवळपास सव्वादोन तास सुरू होती.

महाविकासआघाडीची उद्या (२३ नोव्हेंबर) पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळाली आहे.या बैठकीसात काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण, अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेता आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब लागणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषदेत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा संजय राऊत करत होते. शिवसेनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसबोत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांची नावे ही मुख्यमंत्री पदासाठी राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आज अखेर उद्धव ठाकरेंचे नाव मख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

शिवसेनेच्या आमदारांची बैठक

शिवसेनेने आज त्यांच्या सर्व आमदारांची बैठकी मातोश्रीवर बोलविण्यात आली होती. या बैठकीत लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात आले असून शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटलेमध्ये ठेवण्यात आले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या यादीतून ‘ही’ नावे वगळण्याची शक्यता?

News Desk

देशाची आध्यात्मिक, सांस्कृतिक एकता अखंडित ठेवण्याचं काम अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या माध्यमातून होईल! – अजित पवार

Aprna

छत्रपतींचे नाव असलेल्या योजनेतही शासनाचा घोटाळा

News Desk