HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

मुंबई | गेल्या महिन्यात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या महापुरामुळे येथील अनेक गावे उदध्वस्त झाली आहे. महापुरामुळे अनेक लोकांना त्यांचे जीव गमविला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा केला होता. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा जाणे टाळले होते. यानंतर आज (६ सप्टेंबर) उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते. मुंबईत पाऊस पडून पाणी साचल्याने उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आज ही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३२ फूट वाढ झाली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर पाण्याची पातळीत वाढ होत असल्याने गावकऱ्यांनी सतर्क राहावे. पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी दुपारी खुला झाला. खुले झालेल्या दरवाजांची संख्या पाच झाली आहे. सातपैकी पाच दरवाजातून आठ हजार ५४० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. हीच परिस्थिती अन्य धरणांचीही आहे.

 

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे होते | नरेंद्र मोदी

News Desk

राहुल यांच्या मुंबई दौ-याला सुरुवात

News Desk

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk