HW News Marathi
देश / विदेश

अर्णबसाठी रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या रक्तात, मेंदूत गडबड ! ‘सामना’तून भाजपवर निशाणा 

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘सामना’च्या आजच्या (७ नोव्हेंबर) अग्रलेखात ‘ट्रम्प’ संस्कृती भारतात रुजवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करण्यात आली आहे. “अमित शाह, मोदी वैगरे या नेत्यांशी मतभेद असू शकतात. मात्र, ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. ही ‘ट्रम्प’ संस्कृती हिंदुस्थानात कोणी रुजवात असेल तर त्यांनी अमेरिकेत सुरु असलेल्या अराजकाकडे डोळसपणे पाहायला हवे. तसे अराजक कोणाला हिंदुस्थानात हवे काय ?”, असा सवाल उपस्थित करत विरोधकांचा समाचार घेण्यात आला आहे. यात भाजपच्या कारभाराची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी करण्यात आली आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. मात्र, अर्णब यांच्या अटकेनंतर अगदी राज्यापासून केंद्रापर्यंतचे भाजप नेते अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याचाच उल्लेख करत पुढे सामनामध्ये असे लिहिण्यात आले आहे कि, “राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातील आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे”, अशी अत्यंत बोचरी टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

नशीब…भाजपने ‘जेल भरो, साखळी उपोषणा’चे प्रयोग केले नाहीत ! ‘शिवसेने’चा टोला

पुढे विरोधकांना बोचरा टोला लागावत शिवसेनेने म्हटले आहे की, “नशीब की याप्रश्नी भाजपाने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषण यांसारखे प्रयोग सुरु केले नाहीत. मनाने भरकटलेले अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रतील भाजपा पुढारी वागू लागले आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस आपल्या पदावरून पायउतार

News Desk

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

News Desk

बांगलादेशामध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न

News Desk