HW News Marathi
Covid-19

राम मंदिराकरिता शिवसेनेने केलेल्या १ कोटींच्या घोषणेतील १ रुपयाही अद्याप आलेला नाही !

मुंबई | अयोध्या राम मंदिरासाठी १ कोटी रुपये दान करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र, आपल्या या घोषणेप्रमाणे शिवसेनेकडून अद्याप एकही रुपया देण्यात आलेला नाही, असे अयोध्या राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी स्पष्ट केले आहे. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान शिवसेनेकडून राम मंदिर निर्माणाकरिता १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली होती.

येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या राममंदिराच्या भूमिपूजन होणार आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याकरिता कोणाकोणाला निमंत्रण देण्यात आलेले आहे ?शिवसेनेला निमंत्रण आहे का ? याबाबत बोलताना महंत नृत्य गोपाल दास म्हणाले कि, “अयोध्येत येण्यासाठी कोणाला निमंत्रणाची गरज भासत नाही. ज्यांची भावना आहे, ज्याचे प्रेम आहे तो स्वतःहून येतात.” त्याचप्रमाणे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी यांना या सोहळ्याचे निमंत्रण नसल्याच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले,”सर्वांना निमंत्रण दिले जाईल.”

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो. आता एक वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यातच मी मुख्यमंत्री झालो. मला असे कळले आहे की ट्रस्टचे एक बँक अकाऊंट तयार झाले आहे. त्यामुळे, शिवसेना ट्रस्टच्यावतीने आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देत आहोत. तो ट्रस्टने स्विकारावा”, असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेव्हा भाजपसोबत शिवसेना नसती तर राज्य कारभार अधिक चांगला झाला असता !

News Desk

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण

swarit

काँग्रेस नेते राजीव सातव ICU मध्ये, प्रकृती स्थिर; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

News Desk