HW News Marathi
राजकारण

“गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी…”, भास्कर जाधवांची शिंदे गटावर टीका

शिवशंकर निरगुडे | “गद्दार आमदारांनी स्वतःच्या बापाच्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे (Balasaheb Thackeray) नाव लावावे”, अशी टीका शिवसेनेचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले आहे. हिंगोलीतील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) व  खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) हे दोघे शिंदे गटात दाखल झाले. हे दोन लोकप्रतिनिधी शिंदे गटात गेल्यानंतर हिंगोली जिल्हा शिवसेना कमकुवत होत असल्याचे चर्चा रंगल्या जात होत्या. यात आता शिवसेनेने हिंगोली जिल्ह्याचा संपर्कप्रमुख म्हणून बबनराव थोरात (Babanrao Thorat) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तसेच थोरात हे पक्षातील गळती थांबवणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“हिंगोली बाळासाहेबांनी भाजपाला सांभाळले म्हणून आज ते मोठे झाले. पण, शिवसेनेला सांभाळायचे होते तेव्हा भाजपने फक्त त्रास दिला एवढेच नव्हे तर अमित शहा महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला मातीत मिसळण्याची भाषा करतात शिवसैनिकांना त्यांना सोडू नका आगामी निवडणुकीत त्याचा बदला घेऊ ही भाषा करणाऱ्यांना मातीत घालू”, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी हिंगोली येथील मेळाव्यात केले. महात्मा गांधी चौक परिसरात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला संपर्कप्रमुख बबन थोरात माजी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार जयप्रकाश मुंदडा ज्योती ठाकरे जिल्हाप्रमुख विनायक भिसे संदेश देशमुख जिल्हा संघटक बाळासाहेब मगर माजी आमदार संतोष तर्फे अजित मगर गोपू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच हिंगोली जिल्ह्यात मटक्याच्या जीवावर जर शिवसैनिकांना त्रास देत असाल तर याl राखा पोलिसांनी वर्दीची लाज बाळगावी मटकेवाल्यांना आत टाका अन्यथा विधानसभेच्या सभागृहात याचा हिशोब देऊन असा इशारा जाधव यांनी दिला.

जाधव पुढे म्हणाले ते गद्दार झाले ते आगामा काळात दिसणार नाहीत असा एक सर्वे आला आहे कोरोनात काळात चांगले काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हटवून शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार पाडत भाजपने घात केल्याचा जनतेत राग आहे उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार च्या निर्णयामुळेच गद्दारांना पूर्वी व नंतरही मंत्री होण्याची संधी मिळाली राज्यात राष्ट्रवादी व भाजपचे सरकार असते तर हे शक्य होते का? जर राष्ट्रवादी मान्यच नव्हती तर मंत्रीपद न घेता आमदार म्हणून काम करायला का तयार झाली नाही? माझ्या वडिलांचे नाव का घेता तुमच्या वडिलांचे नाव घेऊन जनतेसमोर जा, असे उद्धव ठाकरे यांनी आव्हान देतच या गद्दारांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष आहेत. त्याचे नाव कोणीही घेऊ शकते असा सूर लावला मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदावरून हटवली तर आता तुमच्या मंत्रीपदाची पाटी बाळासाहेबांना बाप म्हणून लावा तर तुम्हाला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो असे उत्तर जाधव यांनी दिले.

दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे व अपक्ष जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांना शिवसेनेत प्रवेश केला. या नेत्यांना मोठा सन्मान मिळत असल्यामुळे जुने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या कार्यकर्त्ये नाराज असल्याचे कळताच लगेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईत बोलावून त्यांची समजूत काढल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पक्षातील नकारात्मक सुरतुर बंद झाले आहेत. शिवसेनेमधील काहीही नाराजी नाहीये, शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी काल (12 सप्टेंबर) हिंगोलीमध्ये कार्यकर्त्यांसाठी उत्साह वाढविणारा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

शिवसेना पक्षप्रमुख आमचे नेते – बबनराव थोरात

यावेळी बबनराव थोरात म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख आमचे नेते आहेत. आमचे तारणहार आहेत. म्हणणाऱ्या गद्दारांनी स्वतःच्या घराच्या पुढे लावलेल्या पाटीवरील बापाचे नाव काढून शिवसेनाप्रमुखांचे नाव लावले पाहिजेत. तुम्ही स्वतःच्या बापाचे नाव काढून बाळासाहेबांचे नाव लावल तरच तुमची निष्ठा आम्हाला दिसेल. तुमची निष्ठा आम्हाला पाहायची आहे”, अशा शब्दात टीका केली आहे. तसेच भास्कर जाधव उदय सामंतांवर देखील निशाणा साधत म्हणाले, ” सामंत एवढा भंपक माणूस मी पाहिला नाही. सामंत हे स्टंटबाजी करून स्वतः चे पोलीस संरक्षण वाढवून घेतात, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. जाधवांनी हिंगोळी शहरात शिवसेनेकडून आयोजित केलेल्या बोलत होते

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk

मोदी-शहा क्लीन चिट प्रकरण | अशोक लवासांचा बैठकींवर बहिष्कार

News Desk

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा थेट मंत्रालयावर धडकणार !

News Desk