HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेची ताकद कमी होतेय, सिंधुदुर्गातील जनता आता शिवसेनेला साथ देणार नाही !

मुंबई । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे संपूर्ण निकाल आता काहीच तासांत स्पष्ट होतील. दरम्यान, अगदी सुरुवातीला अगदी आलेल्या कलांनुसार भाजप अनेक ठिकाणी पिछाडीवर होता. त्यामुळे सिंधुदुर्गातही भाजपसह राणेंना मोठा फटका बसू शकतो अशी चर्चा होती. मात्र, हे चित्र काहीच तासांत पूर्णपणे पालटले. यावर बोलताना भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सिंधुदुर्गात ७० पैकी ४७ ग्रामपंचायती आम्ही जिंकलो आहे. तर शिवसेनेच्या ७० पैकी २१ जागा आल्या. राज्यात निकालात शिवसेना थोडी पुढे असेल. पण आमचे १०५ आमदार आहेत. शिवसेनेचे ५६ आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कमी होत आहे.”

सिंधुदुर्गातील जनतेचे आभार मानताना नारायण राणे म्हणाले की, “सिंधुदुर्गात ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजप यश मिळाले आहे. सिंधुदुर्गच्या जनतेने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आहे. जिल्ह्याचा विकास करण्याची क्षमता माझ्यात आहे याची जनतेला खात्री आहे. त्यामुळे मी जनतेचा ऋणी आहे.” दरम्यान यावेळी शिवसेनेच्या जनतेचे आभार मानताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

शिवसेनेवर टीका करताना यावेळी नारायण राणे म्हणाले की,

“पालकमंत्री, आमदार, खासदार असतानाही तुम्हाला फक्त २१ जागा मिळाल्या यावरूनच तुमची ताकद कमी झालेली दिसते आहे. या पुढच्या निवडणुकीत तर तुमची ताकद यापेक्षाही कमी झाली दिसेल. शिवसेनेने कोणतीही विकास कामे केली नाहीत. जिल्ह्याच्या नियोजनासाठी निधी दिला नाही. सिंधुदुर्गातील जनता आता शिवसेनेला साथ देणार नाही”, असा इशारा सुद्धा यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग! – मंत्री संजय राठोड

Aprna

कविता चौतमल पनवेल महापालिकेच्या महापौर

News Desk

राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा- चंद्रकांत पाटील

News Desk