रायगड | रायगडावर शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा पहाण्यासाठी बुधवारी ६ जून रोजी जमा झाले होते. मात्र यंदाच्या या सोहळ्याला गालबोट लागले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर खाली उतरत असताना महादरवाजाजवळ शिवभक्तांची कोंडी झाली होती. या दरवाजातून बाहेर पडताना अंगावर दरड पडल्यामुळे एका शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना आज रायगडावर घडली आहे.
Rajyabhishek Sohla, 345th anniversary of coronation of Chhatrapati Shivaji Maharaj, celebrated at Raigad Fort in #Raigad, earlier today. The event was organised by Sambhajiraje Chhatrapati, descendant of Shivaji Maharaj and BJP MP from Kolhapur. #Maharashtra pic.twitter.com/Sm0PdKkjju
— ANI (@ANI) June 6, 2018
तसेच दरम्यान झालेल्या या दुर्घटनेत काही शिवप्रेमी जखमी देखील झाले आहेत. मृत्यू झालेल्या शिवभक्ताचे नाव अशोकदादा उंबरे असे असून केवळ २३ वर्षे वय असलेले अशोकदादा हे उस्मानाबादचे रहाणारे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गर्दी झाल्यामुळे खाली उतरता येत नसल्यामुळे पायर्यांवर हजारो शिवभक्त बसले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त जमा झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या शिवभक्तांच्या उपस्थित राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला.
दरबारातून शिवरायांची पालखी निघाली तेव्हा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी रायगड दणाणून गेला होता. परंतु राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर माघारी परतण्यासाठी शिवभक्तांनी एकच गर्दी केली. महादरवाजा येथून बाहेर पडल्या नंतर अंगावर दरड पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.