HW News Marathi
Covid-19

“…नाहीतर मी पेट्रोल टाकून गाडी फुकून देईन”, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई । हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर यांची एक खळबळजनक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. गाडी मिळायला २ तास लागले म्हणून या हिंगोलीच्या शिवसेना आमदाराने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत “२० मिनिटांत गाडी पाठव नाहीतर पेट्रोल टाकून फुकून देईन”, अशी थेट धमकीच संबंधित व्यक्तीला दिला. त्यांच्यातील फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.

संतोष बांगर यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण :

गाडी पाठवणारा इसम : हॅलो

शिवसेना आमदार संतोष बांगर : हा साहेब

गाडी पाठवणारा इसम : हा दादा, गाडी आता इथून निघाली थाळीगावहून… अर्ध्या-पाऊण तासात पोहोचेल बघा तिथे तुम्हाला.

शिवसेना आमदार संतोष बांगर : लय बोर व्हायले बघा मी इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी 108 ची चालू देणार नाही… मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन

गाडी पाठवणारा इसम : दादा..

शिवसेना आमदार संतोष बांगर : काय दादा-दादा… जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचंय आणि तुम्ही म्हणता की गाडी नाही. दोन घंटे झाले वाट पाहून राहिलो

गाडी पाठवणारा इसम : दादा बरोबर आहे, पण दोन गाड्या नांदेडला गेल्या. थाळीगावहून गाडी पाठवतो.

शिवसेना आमदार संतोष बांगर : दोन तासापासून राहते का?

गाडी पाठवणारा इसम : अहो बरोबर आहे

शिवसेना आमदार संतोष बांगर : मी तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथे, नाहीतर उद्यापासून… गाडी मी पेट्रोल टाकून फुकून देईन पाहा.

गाडी पाठवणारा इसम : नाही दादा. काहीच प्रॉब्लेम नाही

शिवसेना आमदार संतोष बांगर : मला लवकरात लवकर गाडी पाहिजे. दोन तास झाले मी वेट करुन राहिलो तुमच्या गाड्यांची

गाडी पाठवणारा इसम : मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय

शिवसेना आमदार संतोष बांगर : काय धंदा झाला का… दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हद्द झाली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष… त्याला संभाजीनगरला न्यायचंय. त्याची तब्येत बराबर नाय आणि तुम्ही असे करायला लागले. चुकीचं नाहीतर काय तुमचं ?

गाडी पाठवणारा इसम : दादा बरोबर आहे

शिवसेना आमदार संतोष बांगर : मला काही सांगू नका.. ताबडतोब 20 मिनिटात गाडी आली पाहिजे तिथे… दोन घंट्यापासून थाळीगावहून गाडी येते?

गाडी पाठवणारा इसम : दादा आली आहे गाडी आता तिथं

शिवसेना आमदार संतोष बांगर : बाकीची कामं सोडा आणि ती कामं करा आधी

गाडी पाठवणारा इसम : हो दादा, गाडी पाठवतो

तुमच्या लक्षात असेल तर हे हिंगोलीतील शिवसेनेचे हे तेच आमदार आहेत ज्यांनी हिंगोलीतील गंभीर कोरोनास्थितीत रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आपली स्वत:ची FD मोडून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला होता.

संतोष बांगर यांचे मोठे कौतुक झाले होते. कारण त्यांनी स्वतःची एफडी मोडून रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी खाजगी वितरकाला पैसे ९० लाख उपलब्ध करुन दिले होते. या रकमेतून जिल्ह्यात 5 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळाला. मात्र, आता संतोष बांगर यांची ही एक अत्यंत आक्रमक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. यामागचे नेमके कारण काय ? असा सवालही उपस्थित होतो आहे.

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी मुख्यमंत्र्यांकडे ३ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी करणार ! 

News Desk

पुण्यातील हॉटस्पॉट परिसरात ५१.५% लोकांना होऊन गेला कोरोना

Gauri Tilekar

राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही; निर्बंध कठोर करणार! – राजेश टोपे

Aprna