मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेत्या, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. कंगना राणावतचे ऑफिस तोडल्यानंतर सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी कंगनाने पुन्हा एकदा अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना लक्ष्य केलं आहे. कंगना राणावतने उर्मिला यांनी घेतलेल्या नवीन ऑफिसवरून टीका केली होती. यावर आता उर्मिला यांनीही कंगनाला थेट आव्हान दिलं आहे. “तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या”, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आव्हान दिलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1345610003596541954?s=20
उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच मुंबईत नवीन कार्यालय खरेदी केले. त्यावरुन कंगनाने “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोकं म्हणतात तसं भाजपाला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर 20-25 कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” असं ट्विट करत उर्मिलाला लक्ष्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना उर्मिला यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
“नमस्कार कंगना जी…माझ्याबद्दलचे तुमचे जे उच्च विचार आहेत ते मी ऐकले आहेत. मीच काय तर पूर्ण देशाने ते विचार ऐकलेत. आज पूर्ण देशासमोर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा…मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते…मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा, एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे,आहेत याची माहिती मलाच काय पण देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे…तुमच्या उत्तराची वाट बघतेय.. तोपर्यंत…जय हिंद…जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया”, असं आव्हान उर्मिला यांनी कंगनाला दिलं आहे.
गणपति बाप्पा मोरया 🙏🏼@KanganaTeam pic.twitter.com/m8mRgbsg6o
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) January 3, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.