HW News Marathi
महाराष्ट्र

३६ वर्षांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मतं मागितली !

मुंबई । पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आता फक्त भाजप आणि राष्ट्रवादीचेच नेते नव्हेत तर शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सभेत जोरादार बॅटिंग केली. “माझ्या ३६ वर्षांच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मत मागायची संधी मिळाली”, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. “खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटण”, असे आवाहन करत यावेळी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंसाठी प्रचार केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना, “भाजपचं आणि आमचं लव्ह मॅरेज होतं”, असे देखील म्हटले आहे. त्यापुढे, गुलाबराव पाटील यांनी “शिवसेनेने आमच्या सारख्या छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. येत्या काळात मंगळवेढा देखील टॅंकरमुक्त करणार”, असे आश्वासनही केले आहे. “खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन. तुमची देण्याची ताकद आहे आमची घेण्याची आहे. ज्याच्या घरी जास्त चप्पल जोडे येतात तो खरा श्रीमंत असतो”, अशा खास शैलीत यावेळी गुलाबराव पाटील यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पंढरपूरकरांकडे मते मागितली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!; वानखेडे प्रकरणावरून सोमय्या संतापले

News Desk

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज, निलेश राणेंचा प्रहार

News Desk

समाजाच्या उत्तम भविष्यासाठी नव्या पिढीला संस्कृतीची माहिती आवश्यक! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna