HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, आमदारांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील पक्षात कुरबुरी असल्याचे वारंवार समोर आले होते. मात्र, असे काही नसल्याचे देखील पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुन्हा एकदा काही आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.शिवसेनेच्या आमदारांपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद होतात, असा सूर शिवसेना आमदारांनी लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आभासी बैठकीत हा मुद्दा सेना आमदारांनी मांडल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह रविवारी शिवसेना आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांची कामे पटापट होतात, असा दावा सेना आमदारांनी केला आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या कामांना हवी तशी गती मिळत नसल्याची खंत आमदारांनी या बैठकीत मांडली आहे. दरम्यान, आधी लॉकडाऊनचा कालावधी, प्रशासकीय, सनदी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांवरुन राष्ट्रवादी- शिवसेनेत असलेले मतभेद उघड झाले होते. आणि आता शिवसेनेच्या आमदारांनी ही व्यक्त केलेली नाराजी कोणते नवे वळण आणणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर सेना आमदारांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहे. या मागण्याचा सातत्याने पाठपुरावा व्हावा आणि शक्य ती कामं लवकरात लवकर व्हावी असा या मागील उद्देश आहे.

दरम्यान, आपले महत्व कमी होईल म्हणून गटनेते एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू मात्र यावर नाराज असल्याचे समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वायकर यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याशी संपर्क कमी येईल म्हणून नाराजी असल्याची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वयस्कर राज्यपालांसोबत कशी भाषा वापरतात? सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू; ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशन जागण्याची शक्यता

Aprna

शरद पवारांच्या कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नाना पटोलेंचं पवारांकडे बोट?

News Desk