HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

इतक्या लाटा आल्या तरीही शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला राखला !

ठाणे | “जेव्हा विरोधक नसतात तेव्हा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आणखी वाढते. लोकसभेदरम्यान किती लाटा आल्या परंतु शिवसैनिकांनी आपला बालेकिल्ला मजबूत राखला”,अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या शेकडो असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज (१० जुलै) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बरोरा कुटुंब हे १९८० पासून पवार कुटुंबासोबत होते. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादीचे नेते म्हणून पाहिले जात होते. मात्र, बरोरा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग बरोरा यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. “ठाणे हा नुसता शिवसेनेचा बालेकिल्ला नाही तर अभेद्य किल्ला आहे. बरोरा यांनी ज्या अपेक्षेसह शिवसेनेत प्रवेश केला आहे ती अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Related posts

पाकिस्तानने अणूबॉम्ब ईदसाठी ठेवलेला नाही, मेहबुबा मुफ्तींना पाकिस्तानचा पुळका

News Desk

#Results2018 : राजस्थानमध्ये काँग्रेस सुसाट

News Desk

Bhima Koregaon Case : वरवर राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

News Desk