मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सक्रिय असलेले अनेक पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षही बिहार निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
शिवसेनाही बिहार विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहारमध्ये एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. “शिवसेना ४० ते ५० जागा लढवणार आहे. आतापर्यंत युती करण्यासंदर्भात कुणाशीही चर्चा झालेली नाही. पुढील आठवड्यात मी पाटणाला जाणार आहे. पप्पू यादव यांच्यासह काही स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढू इच्छित आहे. त्यांची चर्चा करण्याची इच्छा आहे,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Shiv Sena will contest 40-50 seats, there is no talk about alliance with anyone till now. I'll go to Patna next week. Local parties including that of Pappu Yadav want to talk to us: Shiv Sena's Sanjay Raut on if Shiv Sena will fight #BiharElections in alliance with NCP pic.twitter.com/FWTrf9pAUL
— ANI (@ANI) October 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.