HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे ओळखपत्र दाखवा, मोफत पेट्रोल मिळवा ! शिवसेनेची अनोखी घोषणा

मुंबई । राज्यात शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेने आज (१९ जून) आपल्या वर्धापनदिनी भाजपला डिवचले आहे. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आज आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करत स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. तर ह्यात विशेषतः भाजपसाठी एक स्पेशल घोषणाही आहे.

आमदार वैभव यांच्या या उपक्रमात, सर्वसामान्य नागरिकांना प्रति वाहन १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र असलेल्या प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत दिले जाणार आहे. वैभव नाईक यांनी आपल्या या उपक्रमाबाबतचे ट्विट देखील केले आहे. त्यामुळे, आता ह्या अनोख्या घोषणेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत असून यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे सरकार अंतर्विरोधामूळेच पडले, चंद्रकांत पाटलांचा दावा

News Desk

वानखेडेंविरोधात आरोप कोर्टात करा, ट्विटरवर का करता? क्रांती रेडकरचे मलिकांना प्रतिउत्तर

News Desk

“शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा”, नितेश राणेंचा संताप!

News Desk