नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आता तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांत, जिल्ह्यांत अडकलेल्या श्रमिकांसाठी रेल्वे आणि सरकारने पुढाकार घेत विशेष ट्रेन सुरु करत त्यांना आपापल्या गावी जाण्याची सोय ही करुन देण्यात आली आहे.
या सगळ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या श्रमिकांना त्यांच्या ठिकाणावर सोडल्यानंतर ही ट्रेन रिकामीच परत येत आहेत तसेच, या सर्व श्रमिकांना मोफत अन्न आणि पाणीही देण्यात येत आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे सोशल डिस्टन्स पाळतच प्रवाशांना रेल्वेत बसवले जात असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Indian Railways is running Shramik special trains keeping berths empty in each coach to maintain social distancing. The trains are returning empty from destinations under lock & key. Free food and bottled water is being given to migrants by railways: Railway Ministry Sources pic.twitter.com/MJKnI28jxn
— ANI (@ANI) May 4, 2020
आत्तापर्यंत देशातून या श्रमिकांसाठी ३४ विशेष ट्रेन या सोडण्यात आल्या आहेत. या सर्व श्रमिकांना सामाजिक बांधितलकी जपत आपापल्या राज्यांत, जिल्ह्यांत सोडले जात आहे. देशात सध्या कोरोनाच्या संकटाने या श्रमिकांचे होणारे हाल लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Railways has run 34 Shramik special trains so far from different parts of the country and is fulfilling its social responsibility of providing safe and convenient travel especially to the poorest of the poor in a time of crisis: Railway Ministry Sources #CoronavirusLockdown
— ANI (@ANI) May 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.