मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या १०वी आणि १२च्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार असल्याचे माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहनही मंडळाने केले आहे.दरम्यान, महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रक काढत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे.
कोविड संसर्गाच्या काळात परीक्षा सुरक्षित घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू आहे. मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तारखात सध्या बदल नाहीत, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षी कोरोनामुळे शालेय वर्ष उशीरा सुरू झालं आणि परीक्षाही लांबल्या. मुंबई, पुणे यांसह आणखी काही ठिकाणी तर अद्याप शाळासुद्धा सुरू झाल्या नाही आहेत. पण परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
या वर्षी १२वीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१मेला १२वीचा शेवटचा पेपर असणार आहे. तर १०वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. १०वीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board declare exam dates for HSC and SSC 2021 in the state. SSC exams to start from 29 April while HSC exams to start from 23 April following #COVID19 guidelines.
Guidelines to be issued in the next two days.
— ANI (@ANI) March 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.