HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

कोकणात जाण्यासाठी बुकिंग कधी सुरू होणार, काय नियम? जाणून घ्या…

मुंबई | गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे तर ई पासची गरज नसल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (४ ऑगस्ट) दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता क्वारंटाइनचा कालावधी हा १० दिवसांचा करण्यात आला आहे. तर ७ हजार गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार असून आजपासून (४ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे.

काय आहेत नियम ?

– एस टी मध्ये २२ लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.

– खासगी बस चालकांना एस. टी. पेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येईल.

– कोकणवासीयांना १२ ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. १२ तारखेला रात्री १२ पर्यंत पोहचतील त्यांना होम क्वारंटाइन होणे गरजेचे असणार आहे.

– ज्यांना १२ तारखे नंतर जायचे असेल त्यांना ४८ तास आधी कोरोनाची चाचणी करावी करावी लागणार आहे आणि ती निगेटीव्ह आली तरच त्यांना कोकणात जाता येणार आहे असाही नियम करण्यात आला आहे.

Related posts

होळीमध्ये ‘कोरोना’च संकट जळून खाक व्हावे !

News Desk

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

अपर्णा गोतपागर

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांवर स्पष्टीकरण

News Desk