मुंबई | राज्य परिवहन महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या पाश्वभूमीवर राज्यातील २५० पैकी १६० एसटीचे आगार हे सध्या बंद असून आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आंदोलनात कर्मचारी मोठ्या सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील एका चालकांनी चक्क हातात बांगड्या भरून ड्युवटीवर हजर झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणामुळे एसटी चालकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा प्रकार दापोली एसटी आगारातील चालकात घडला असून अशोक वनवे असे या चालकाचं नाव आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून देखील पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईसह १७ एसटी कर्मचारी संघटनांची आज (८ नोव्हेंबर) बैठक होणार आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नवर आता उच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.