HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक सुरु

मुंबई | फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (१६ जून) पार पडला आहे. आता उद्या म्हणजेच सोमवारपासून (१७ जून) विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होईल. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आज दुपारी १ वाजता विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी ही संयुक्त पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरु झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, अजितदादा पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, भाई जयंत पाटील, अबू आझमी, शरद रणपिसे, कपिल पाटील, दिलीप वळसे पाटील, हेमंत टकले, नसीम खान, जोगेंद्र कवाडे, रामहरी रूपनवर, शशिकांत शिंदे, बसवराज पाटील मुरुडकर, भास्करराव जाधव आदी उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हिसा उल्लंघन प्रकरणी १५६ परदेशी नागरिकांवर गुन्हे

News Desk

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

Aprna

साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू!

News Desk