मुंबई | राज्यात हळूहळू एक एख बाबी सुरु होत आहे. राज्यात अनलॉक- चा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेस्टॉरन्ट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (२८ सप्टेंबर) भेट घेतली. गेल्या ६ महिन्यांपासून रेस्टॉरन्ट्स बंद असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. रेस्टॉरन्ट्स सुरू करण्याची कार्यपद्धती ठरवली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने रेस्टॉरन्ट्स सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरन्ट्स सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “कोव्हिडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते, ते आपण एक-एक करुन सुरु करत आहोत”.
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती संबंधितांना पाठविली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना म्हणाले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 28, 2020
“व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यांच्याकडून कररुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न,,” असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोव्हिडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्दैवाने काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करु, ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्या दृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.