HW News Marathi
महाराष्ट्र

नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीसांची सुरक्षा!; मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बनावट नोटांचं रॅकेट चालवत होतं, असा आरोप राज्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या काळात राज्यात एकही बनावट नोट सापडली नाही. कारण बनावट नोटांचं रॅकेट हे फडणवीसांच्या पाठिंबा असल्याचंही मलिकांनी सांगितलं. मलिकांनी आज (१० नोव्हेंबर) हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हणालं

तसेच ८ ऑक्टोबर २०१७मध्ये इंटेजिलन्सनं बीकेसीमध्ये छापेमारी करण्यात आली होती. त्यावेळी १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. परंतु फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला, असे ही मलिक म्हटलं. आज मी जे काही आरोप फडणवीसांवर केले त्यांची सर्व माहिती गृहविभागाला दिली आहे. बनावट नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं. बनावट नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होता, असेही मलिक म्हणालं.

फडणवीसांचं रियाज भाटींशी संबंध का ?

अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? आणि रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत?, गुंड सहजपणे पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचतोच, असा सवाल ही मलिकांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे, असल्याचा खुलासाही मलिकांनी केला आहे. तसेच रियाज भाटीला सहारा विमानतळावर दोन बनावट पासपोर्टनिशी पडण्यात आलं होतं. मात्र, त्याला २ दिवसात जामीन कसा मिळाला?, फडणवीसांचे भाटींशी संबंध का?, असे अनेक प्रश्न मलिकांनी आजच्या पत्रकार परिषदेतून फडणवीसांना विचारला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण केलं – संजय राठोड

News Desk

वैद्यकीय गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलीस विभाग स्थापनचा विचार करा, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

News Desk

“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा

News Desk